औरंगाबाद : नांदुर मधमेश्वर कालव्यातून वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी त्वरीत आवर्तन सोडावे या मागणीसाठी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगज्ञावकर यांच्या नेतृत्वात सुमारे दोनशे ग्रामस्थ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ औरंगाबाद कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. गंगापूर व वैजापूर तालुक्यात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई आहे 200 टॅँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी हे पाणी पुरेसे नाही, तालुक्यातील मण्याड व गळमोडी धरणात काहीसा पाणीसाठा आहे. परंतु ते आठवडाभर पुरेल इतकाच आहे. यासाठी नांदुरमधमेश्वर धरणातुन पाण्याचे आवर्तन देणे आवश्यक अन्यथा दोन्ही तालुक्यातील पशुधन व ग्रामस्थांना स्थलांतक्षर करावे लागण्याची वेळ येईल असे होऊ नये म्हणून पाणी सोडावे या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.